जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
यंदाच्या वर्षीचा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगलीच्या वतीने दिला जाणारा रंगभूमीवरील सर्वोच्च विष्णुदास भावे गौरव पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला असून,त्यांचा जन्म 12 जुलै 1947 रोजी झाला आहे.त्यांनी आजपर्यंतच्या रंगभूमीवरील कार्यक्षेत्रात अजरामर कामगिरी केली आहे.त्यांनी "गोष्ट जन्मांतरीची", "बॅरिस्टर" आदी प्रमुख नाटकात काम केले असून," आघात"," तू तिथे मी" आदी चित्रपटात काम आहे.त्यांना यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे "जीवन गौरव" पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले असून,बीए ला त्यांनी तत्त्वज्ञान,मानसशास्त्र, संस्कृत आदी विषयात प्राविण्य मिळवले आहे.ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय संगीताची मध्यमा ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून,नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय येथे,इब्राहिम अलकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली, अभिनय क्षेत्रातील शिक्षणाचा तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी टीव्हीवर देखील "अग्निहोत्र"," कुंकू "आदी सिरीयल मध्ये रंगभूमीवरील अभिनयाची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदाच्या वर्षीचा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगलीच्या वतीने दिला जाणारा रंगभूमीवरील सर्वोच्च विष्णुदास भावे गौरव पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाल्यामुळे,त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क च्या वतीने,ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना मिळालेल्या रंगभूमीवरील सर्वोच्च विष्णुदास भावे गौरव पुरस्कार बद्दल,हार्दिक हार्दिक अभिनंदन करून, त्यांच्या पुढील भावी रंगभूमीवरील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.