जीपीए व एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सुदुढ बलक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वाटप.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व एकात्मिक बालविकास सेवा योजना कोल्हापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिव्हेश्वर हॉल येथे पार पडला.सुदृढ बालक स्पर्धा कोल्हापूर मेडिकल असोसिएन हॉल येथे २४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती. 

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.मोहन पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.मोहन पाटील यांनी लहान मुलांचे आरोग्य यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उपस्थितांमध्ये कोल्हापूर मेडिकल असोसिएन अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर यांनी लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक आरोग्या विषयी जागृती निर्माण करणे व सामाजिक स्वास्थ्यकरिता लहानपणापासूनच संस्कार करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रशांत शिर्के (बालविकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर शहर )यांनी बालसंगोपन विषयाच्या सरकारी योजना बद्दल माहिती दिली.जीपीए अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे यांनी या योजनेच्या विविध कामाबद्दलचे आपले अनुभव कथन केले.

कार्यक्रमात विजेत्या सुदृढ बालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविका सौ. कुराडे यांनी कार्यक्रमाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कोल्हापूर शहर अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,सुपरवायझर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती जीपीए सेक्रेटरी डॉ. महादेव जोगदंडे,डॉ.गुणाजी नलवडे,डॉ.राजेश सातपुते,डॉ. पूजा पाटील,डॉ शुभांगी पार्टे,डॉ राजेश सोनवणे,डॉ. शिवराज जितकर,डॉ.हरीश नांगरे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक डॉ.वर्षा पाटील यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनीता देसाई,व डॉ.स्वाती नांगरे यांनी केले.आभार डॉ महादेव जोगदंडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top