जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली आहे.आता इच्छुक उमेदवारांना २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा,असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड,पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.,अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला),उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा,पासपोर्ट आकाराचा फोटो,हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.