महात्मा बसवेश्वरांच्या ‘शरण साहित्य अध्यासन केंद्रा’साठी मंजूर केलेल्या रु.३ कोटी रकमेतील १.५ कोटी रुपयांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास हस्तांतरण.--!

0

- पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचे काम सुरू होणार,रु.१० लाखांचा धनादेश अग्रीम मूर्तीकारांना दिला

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

महात्मा बसवेश्वरांनी समाज  प्रबोधनासाठी आपले आयुष्य खर्ची घातले अशा महात्मा बसवेश्वरांचे शिवाजी विद्यापीठामध्ये ‘शरण साहित्य अध्यासन केंद्र’ सुरू करण्यात आहे. त्यांच्या संशोधनासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.यापैकी आज  जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण योजनेतून १.५ कोटी रुपयांचा निधी आदेश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांच्याकडे हस्तांतर केला.शरण साहित्य अध्यासन केंद्रातील संशोधनतून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसाराची महत्त्वपूर्ण कामगिरी होईल,असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित,महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी,जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार,कुलसचिव व्ही.एन.शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री पुढे म्हणाले,ऐतिहासिक पन्हाळगडावर हजारो पर्यटक देशातून राज्यातून येत आहेत.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा पन्हाळगडावर नाही.अनेक दिवसापासून नगरपालिकेनं पुतळा उभारण्याचा प्रयत्न तिथे केला.पन्हाळा गडावर असणाऱ्या तलावाच्या सुशोभिरणाचं कामही अपूर्ण होतं हे सर्व पालकमंत्री म्हणून माझ्या लक्षात आले.तेंव्हा पुतळ्याला शासकीय निधी देता येत नाहीत म्हणून मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून २५ लाख रुपये निधी द्यायच ठरवले.इतर बाजूच्या कामांसाठी नगरपालिकेच्या नगरोत्थान मधून निधी दिला जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कामात लक्ष देवून स्मारकाच्या ठिकाणाचे चांगल्या पद्धतीनं सुशोभिकरण करण्याचे काम करावे अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पन्हाळगडावर आम्ही लवकरात लवकर अनावरण करु,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी मूर्तिकार श्री.पुरेकर यांना मुश्रीफ फाउंडेशन मार्फत १० लाख रुपयांचा धनादेश अग्रीम म्हणून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top