जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वसाधारणपणे विविध एक्झिट पोल्सनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार,महायुतीकडे सत्ता जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.महाराष्ट्र राज्यात संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत जवळपास अंदाजे 60% टक्के मतदान झाल्याचे समजत आहे. महाराष्ट्र राज्यात ठीक ठिकाणी हाणामारीच्या घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेने झाले आहे.
चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोल नुसार महायुतीस 152 ते 160 जागा,महाविकास आघाडी 130 ते 138 जागा व इतरांना 6 ते 8 जागा मिळतील असा अंदाज असून,भास्कर संस्थेच्या एक्झिट पोल नुसार 125 ते 140 जागा महायुतीस मिळण्याचा अंदाज असून 135 ते 150 जागा महाविकास आघाडी जागा मिळण्याची शक्यता असून,जवळपास इतरांना 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मॅट्रिझ संस्थेच्या एक्झिट पोल नुसार महायुतीस 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता असून,महाविकास आघाडीस 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली असून, इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.इलेक्ट्रोरल एजन्सीच्या माध्यमानुसार महायुतीस 118 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला असून,महाविकास आघाडी 150 जागा मिळण्याची शक्यता आहे व इतरांना 20 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान जवळपास बऱ्याच एक्झिट पोल च्या अंदाजानुसार महायुतीस सत्तेचा मुकुट मिळण्याची शक्यता असून, महाराष्ट्र राज्यात सर्वत्र तिरंगी- चौरंगी लढती झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांच्यात चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या आहेत.महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीतील बहुतांशी ठिकाणी विविध पक्षातील बंडखोर उमेदवारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.एकंदरीतच दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील होणाऱ्या मतमोजणीत, राज्यातील सत्तेचा मुकुट कोणास मिळणार.? हे पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे.