जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबुराव चव्हाण हे आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीच्या सुट्टीमध्ये राजस्थानमध्ये फिरण्यासाठी गेले असता,भीषण अपघातामध्ये त्याच्यासह कुटुंबातील एकूण ४ जणांचा मृत्यू झाला.बाबुराव चव्हाण व दिलीप चव्हाण हे दोघे बंधू हुपरी शहरांमध्ये अनेक वर्षापासून चांदी व्यवसाय करीत आहेत. या दोघां बंधूंचे आदमापूर येथे ज्वेलर्स असून ते मंगळवार दि. 12 तारखेला रेल्वेने राजस्थानला आपल्या पत्नी- मुलगा- मुलगी असे कुटुंबीय गेले होते.राजस्थान मधील उद्योजकांना भेटून,तिथून चार चाकी वाहन घेऊन,काही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जोधपुरला जात असताना पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ त्यांचे वाहन झाडाला जाऊन धडकले. सदरहू झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील बाबुराव चव्हाण वय वर्षे 50,सारिका चव्हाण वय वर्षे 38, मुलगी साक्षी वय वर्षे 19 मुलगा,संस्कार वय वर्षे 17 यांचा मृत्यू झाला असून,पट्टणकडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे वय वर्ष 40 व रवींद्र डेळेकर वय 32 हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत.सदरहू झालेल्या घटनेच्या अपघाताची माहिती हुपरी शहरांमध्ये मिळतात संपूर्ण शहर हळाळून गेले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबुराव चव्हाण हे अत्यंत चांदी व्यवसायात नावाजलेले सुप्रसिद्ध कुटुंब होते.सदरहू झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे व एकाच कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामुळे,सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.