सांगली जिल्ह्यातील जत येथील श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने,श्री.दत्त जयंतीनिमित्त दि.14 डिसेंबर शनिवार व दि. 15 डिसेंबर रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यातील जत येथे श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्ट च्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.मंदिर ट्रस्टच्या वतीने दर पोर्णीमेला पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा,त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम,दुपारी १२ वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांची आरती व स्वामीचरणी पुष्प वाहण्याचा कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसाद असे नित्य पोर्णीमेला कार्यक्रम होत आहेत.नुकतेच श्री.स्वामी समर्थ मंदिर चतुर्थ वर्धापनानिमित्त झी.टी.व्ही.वरील गजर किर्तनाचा,सोहळा आनंदाचा या कथामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.दि.२ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.गीतांजलीताई झेंडे व ह.भ.प.संगीताताई चोपडे यांच्या मार्गशीर्ष महात्म्य व खंडोबाची कथा हा झी.टी.व्ही.चा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण ही झी.टी.व्ही.वर दि.१६ डिसेंबर पासून सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत होत आहे.

श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या पादुकांची स्थापना मंदिरात करण्यात येणार आहे.या एक किलो वजनाच्या चांदीच्या पादुका स्वामीभक्त श्री.मोहन मोरे ( दिघंची ) ता.आटपाडी या मुंबईतील भक्ताने मंदिरासाठी अर्पण केल्या आहेत.श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या या चांदीच्या पादुकांची विधिवत स्थापना व पूजा श्री.स्वामी मंदिरात करण्यात येणार असून पादुका स्थापनेनंतर श्रींची आरती व पादुकांवर पुष्पअर्पण करण्यात येणार आहे.त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.रविवार दि.१५ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पोर्णीमेला श्री.दत्त जयंती असल्याने या दिवशी पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा व आरती होणार आहे.त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून.दुपारी १२ वाजता श्रीं.ची आरती व फुले वाहण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर दुपारी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

श्री.दत्त जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवशीय कार्यक्रमाला सर्व भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील,सदस्य लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे,शहाजीबापू भोसले,दिपक पाटणकर, मोहन पवार,सदाशिव जाधव,गणेश सावंत,अतुल मोरे, डी.बी.जाधव,राजवर्धन पवार,अनिल पवार आदीनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top