जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील यळगुड-हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2024 25 या 32 व्या ऊस गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाकरिता विना कपात एक रकमी 3150 रुपये प्रति टन दर जाहीर केलेला असून, दैनंदिन 16000 मे.टन ऊस गाळप क्षमता असलेल्या कारखान्याने यापूर्वी शेतकरी,कामगार,बँका,वित्तीय संस्था,यांची देय रक्कम विनाविलंब अदा करून सहकारी साखर कारखान्याच्या पारदर्शीपणाचे आदर्श उदाहरण कायम ठेवले आहे.
शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या विविध योजनांमुळे सन 2024- 25 या 32 व्या गाळप हंगाम करिता सुमारे 20400 हेक्टर ऊस नोंदणी झालेली आहे.या नोंद झालेल्या क्षेत्रातून हंगामामध्ये 20 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.याकरिता सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनी सर्व पिकवलेला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.