जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज शनिवार दि.7 डिसेंबर 2022"कष्टकऱ्यांची दौलत" खानभाग येथे सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांच्या बाबत नागरिकांची मीटिंग संपन्न झाली.सदर मीटिंगमध्ये सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.खास करून स्ट्रीट लाईट,अपुरा पाणीपुरवठा,अस्वच्छ पाणीपुरवठा,ड्रेनेज रस्त्यांच्या समस्या,स्वच्छतेचा बोजवारा,भटक्या जनावरांचा मोठ्या प्रमाणात होणारा त्रास अशा विविध विषयांच्या समस्यांवर चर्चा झाली.
आम्ही नागरिक जागृती मंचच्या वतीने माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिक यांची व्यापक बैठक मनपा मध्ये घ्यावी अशी आयुक्त साहेबांना विनंती केली होती, मात्र त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.20 तारखे नंतर मा.आयुक्त साहेब सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांना भेटून,व्यापक मीटिंग घडवून आणण्यासाठी तसेच आजच्या मीटिंगमध्ये ज्या काही समस्या आलेले आहेत त्या भाग वाईज पत्र तयार करून त्यांना देणार आहोत व त्याचा निपटारा होई पर्यंत पाठपुरावा करत राहणार आहोत.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांचे मार्फत जी मनपा क्षेत्रात कामे चालू आहेत,त्याबाबत सुद्धा विविध तक्रारी प्राप्त झालेले आहेत.त्या संदर्भात कार्यकारी अभियंता यांची सुद्धा भेट घेऊन व्यापक मीटिंग लावण्यात येणार आहे.खास करून सांगली ते अंकली रस्ता असेल,शिवशंभू चौक ते म्हसोबा चौक,अन्य नगरी विकास व आमदार- खासदार फंडातील कामे,याबाबतीत मा.जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तक्रारी दाखल करून,मीटिंग घेण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती करण्यात येणार आहे.
यावेळी सतीश साखळकर,उमेश देशमुख,महेश खराडे, गजानन साळुंखे,लालू मिस्त्री,उत्तम जाधव,गोपीनाथ जाधव,पैलवान प्रमोद पाटील,रवींद्र यादव,श्रीधर आजगावकर,बंडू मेहता,सुरेश साखळकर,अमित साखळकर,बशीर मुजावर,प्रकाश गावडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.