जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
परभणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये असणाऱ्या संविधानाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हुपरी बौद्ध समाजाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
परभणी मधील ज्या माथेफिरूने ही घटना हे कृत्य केलेली आहे त्याला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी आज करण्यात आली.तसेच परभणी मधील ज्या भीमसैनिकांच्या वर पोलिसांनी लाठीचार्ज व गुन्हे नोंद केलेले आहेत त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा,जाणून बुजून महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांची भावनांशी खेळण्याचा प्रकार जो विद्यमान सरकारने चालू केलेला आहे तो त्वरित थांबवावा अन्यथा हुपरी शहर बंद करू असे निवेदन हुपरी पोलीस ठाण्याचे पी.आय.गजानन सलगर साहेब यांना देण्यात आले.या ठिकाणी थोड्या काळासाठी बौद्ध व नागरिक बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी हुपरीचे माजी सरपंच मंगलरावजी माळगे,माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे,वंचितआघाडी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे,चरणदास कांबळे,डॉ.सुभाष मधाळे,डॉ. स्वप्नील हूपरीकर,जयकुमार माळगे,पप्पू कमलाकर,गणेश शिंगाडे,शुभम शिंगाडे,विद्याधर कांबळे,संदीप कांबळे,सुहास हूपरीकर,भीमराव संघमित्रा,अक्षय फुले,रवी कांबळे,धर्मवीर कांबळे,संदीप हुपरीकर, रणजीत कांबळे ,दशरथ कांबळे अक्षय कांबळे, ऋषिकेश कांबळे, आनंदा कांबळे,उत्कर्ष मधाळे,वामन कांबळे,बाळासो कांबळे,प्रणित मधाळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.