जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी विभाग स्तरावर,जिल्हास्तर व तालुकास्तरावर उल्लास मेळाव्याचे आयोजन करण्यात संदर्भात शिक्षण विभागाने सूचना दिल्या.हुपरी केंद्राचे उपक्रमशील शिक्षक व राज्यस्तर तज्ञ मार्गदर्शक,कन्या विद्या मंदिर हुपरी नं.-01 चे विषय शिक्षक श्री.द्वारकानाथ भोसले सर यांनी आपत्ती - स्वरूप व प्रकार याविषयी स्टॉल मांडणी केली.इन्स्टॉल मध्ये विभाग स्तरावर उल्लेखनीय ठरली.महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक मा.डॉ.श्री.महेश पालकर शिक्षण उपसंचालक मा.डॉ.महेश चोथे साहेब यांनी स्टॉलचे प्रमाणपत्र देऊन कौतुक केले.या स्टॉलची मांडणी खूप आकर्षक होती,परिणामी पाहणाऱ्या व्यक्तीला सहजपणे आशय समजून व स्टॉल पाहून व्यक्ती तत्त्व भारावून जाई. या स्टॉलमध्ये जंपक चित्र,घडी चित्र,तरंग चित्र,विविध समस्यावरील मॉडेल,थ्री डी चित्र,थ्री डी तक्ते,बोलके तक्ते,पोस्टर्स,बॅनर,भित्तिपत्रिका,रंगबेरंगी रंगाच्या माध्यमातून स्व हस्ताक्षरात लेखन केलेले तक्ते,यांचा समावेश होता.त्यामुळे सर्व लोक या स्टॉलचे कौतुक करत होते.साक्षर असो वा निरक्षर कोणालाही पटकन समस्या सोडवणे व ज्ञानात भर टाकणारा,मनाला भारवणारी स्टॉलची रचना केली होती.स्टॉलचे सादरीकरण श्री.भोसले सर स्वतः करत होते,एकापाठोपाठ एक मुद्दे स्पष्टीकरण देत होते.त्यामुळे पाहणारे लोक थक्क होत होते. हातकणंगले तालुक्यामध्ये देखील या स्टॉलची मागणी करण्यात आली होती.सर्वच पाहणाऱ्या शिक्षण प्रेमींना हा स्टॉल आकर्षक वाटत होता.जो तो स्टॉल चा फोटो काढत होता,समस्या समजून घेत होता.मा.आमदार डॉ.राहुल आवारे व मा.आमदार डॉ.अशोकराव माने यांनी देखील या स्टॉलचे कौतुक केले.
शिक्षक संतोष पाचापुरे पूजा भोसले यांनी स्वयंसेविका म्हणुन काम पाहिले.या स्टॉलसाठी मा.श्री.आर.जी.चौगुले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांनी मार्गदर्शन केले.तसेच शिक्षण विस्तार अधिकारी जे.टी.पाटील,श्री.बिरगे,गुरसाळे मॅडम,भारती कोळी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.