कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे, हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या कडून,बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या वर होणाऱ्या अत्याचार- अन्यायाविरोधात, भारत सरकार करून त्वरित कारवाई करण्याची आंदोलनाद्वारे मागणी.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे आज हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने,बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांच्या वर होणाऱ्या अत्याचार व अन्याय विरोधात आंदोलनाद्वारे आवाज उठवून,भारत सरकारने त्वरित पाऊले उचलून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे.ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे,याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे.भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये,अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने 9 डिसेंबर या दिवशी नेताजी सुभाषचंद्र चौक, हुपरी येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली.  आंदोलनानंतर हुपरी नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निराक्षक गजानन सरगर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री.अजित सुतार,श्री. शिवाजी शिंगारे,श्री.शिवाजी मोटे,हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री.नितीन काकडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सोहम हुपरे,वीर शिवा काशीद प्रतिष्ठानचे श्री.निळकंठ माने, चांदी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.दिनकरराव ससे,भाजप युवा मोर्चाचे श्री.उमाजी तांबे,दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री.प्रवीण पाटील,हिंदु जनजागृती समितीचे श्री.किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी पट्टणकोडोली,रेंदाळ,तळंदगे, यळगूड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top