जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील बुधगाव ग्रामपंचायतीची स्थापना 1960 साली झाली.सध्या असणाऱ्या ग्रामपंचायत वास्तूमध्ये पूर्वी बुधगाव राजेसाहेब श्रीमंत माधवराव पटवर्धन यांनी स्वतःच्या मालकीची द मिरज ज्युनिअर स्टेट बँक होती.बँक बंद झाल्यानंतर कालांतराने ही वास्तू राजे साहेबांच्या मार्फत मुन्सिपालिटी स्थापना करण्यासाठी मिळाली.पुढे पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली व याठिकाणी जवळपास दि.13 नोहेंबर 1960 साली ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली.
आज रोजी ग्रामपंचायतीची स्थापना होऊन 64 वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने आज रोजी दि.13/12/2024 रोजी ग्रामपंचायतीचा "64 वा वर्धापन दिन"मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने सांगलीचे नवनियुक्त विधानसभा सदस्य आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती राहिली.त्यानिमित्ताने बुधगाव गावातील सर्व राजकीय पक्ष्यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले तसेच गावच्या विकासासाठी सर्वांनी आपले मनोगत मांडले.
बुधगाव गावचे सरपंच वैशाली विक्रम पाटील,उपसरपंच अविनाश शिंदे,सर्व ग्रामपंचायत आजी माजी सदस्य,आजी माजी सरपंच,उपसरपंच,माजी पंचायत समिती सदस्य,उपसभापती,भाजपचे नेते विक्रम भाऊ पाटील,शिवसेनेचे नेते बजरंग भाऊ पाटील,प्रवीण पाटील,उदय मोरे,राष्ट्रवादीचे महेश सूर्यवंशी तसेच गावातील सर्व राजकीय पक्ष्यांचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.तसेच द journalist असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत यमगर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.