जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
हुपरी प्रतिनिधी - (वैशाली कंगणे)
कोणतीही संस्था चांगले संस्कार आणि उच्च विचाराने प्रगतशील होत असते.याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पैसाफंड बँक.स्व.आप्पासाहेब नाईक (दादा ) व स्व.एल. वाय.पाटील (बाबा ) यांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून रुजवलेले संस्कार आणि त्यांच्या विचारांवर वाटचाल करत बँकेने केलेली प्रगती हीच या दोन व्यक्तींना खरी आदरांजली आहे.संस्थेमार्फत आयोजित या कार्यक्रमांचे खरोखर कौतुक आहे असे प्रतिपादन थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी केले.
आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँकेचे संस्थापक,कार्यकारी संचालक स्व.आ.बा.नाईक (दादा) व बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.एल.वाय.पाटील (बाबा) यांच्या स्मृतीस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सत्कार,पिक प्रदर्शन,शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार,माजी मंत्री प्रकाश आवाडे हे होते.
यावेळी इचलकरंजीतील श्री.आर्य चाणक्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राशिनकर (आदर्श सहकारी संस्था), सिल्व्हर बॉईज ग्रुपचे शितल मोरबाळे (आदर्श समाजसेवी संस्था ), धनंजय खेमलापूरे (आदर्श शेतकरी),शिवाजीराव माळी सर (आदर्श कल्पक उद्योजक),केंद्र समन्वयक राजीव कोरे (आदर्श शिक्षक),२५ वर्षे सेवाकाल पूर्ण केल्याबद्दल सागर कांबळे (शिपाई,मुख्यालय) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच हर्ष शेटे,वसुंधरा देसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ.नीता माने, बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड,श्रीकांत नाईक,प्रकाश पाटील,अरुण गाट,सुरज बेडगे आदिसह विविध संस्थांचे पदाधिकारी,संचालक,शेतकरी,सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब भोजे यांनी केले.प्रास्तविक कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी केले.सूत्रसंचालन पीआरओ शिवाजी पाटील यांनी केले.तर आभार संचालक कल्लाप्पाण्णा गाट यांनी मानले.