महाराष्ट्र राज्यात विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांचे नाव आघाडीवर;त्याबरोबरच भारतीय जनता पार्टी कडून समीर कुणावर आणि चैनसुख संचेती यांचेही नावे चर्चेत.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचे नाव प्रथमतःआघाडीवर असल्याचे दिसत असून,त्याबरोबरच समीर कुणावर आणि चैनसुख संचेती यांचेही नावे चर्चेत असल्याचे समजते.महाराष्ट्र राज्यात विधानसभा अध्यक्ष पदासाठी 8 डिसेंबर म्हणजेच आज सकाळी 10:30 पर्यंत अर्ज सादर करावयाचा असून, राज्यातील विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सोमवारी निवड होणार असल्याचे समजते. 

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा अध्यक्षाची निवड करताना विधान परिषदेचे सभापती पद हे जवळपास शिवसेनेस देणार असल्याचे ठरले गेले असल्याचे समजते आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा राहुल नार्वेकर यांच्याकडे,विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी असा मतप्रवाह असल्याचे दिसत आहे.मागील विधानसभा अध्यक्षपदाच्या राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात देखील,समीर कुणावर यांची तालिका सभापतींचे कर्तव्य म्हणून बजावलेली भूमिका ही विचाराधीन असल्याचे समजते. 

भारतीय जनता पार्टीचे आमदार चैनसुख संचेती यांना सुद्धा विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबतीत,भारतीय जनता पार्टीच्या जुन्या नेत्यांमध्ये काहीसा मतप्रवाहाचा कल दिसत आहे.एकंदरीत सोमवारी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा अध्यक्षांची निवड होईल असे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top