महाराष्ट्र विधानसभेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी समारंभ संपन्न.--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र विधानसभेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी झाला असून,आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आमदार कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

पूर्वीच्या सन 2014 मध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांनी कामकाज पाहिले होते. मुंबईमध्ये विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला दि.7 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होत असून,त्यामध्ये प्रामुख्याने विधानसभेसाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी,सदरहू मुंबईमध्ये तीन दिवसाचे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होत आहे.आमदार कालिदास कोळंबकर हे विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्य पैकी सर्वात ज्येष्ठ सदस्य होय. 

आमदार कालिदास कोळंबकर हे सन 1990 पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत असून,यंदा ते आठव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.मुंबईतील राजभवनामध्ये आज एका छोट्याशा शपथविधी समारंभात महाराष्ट्राचे महामयम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली. महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देऊन,प्रथेनुसार सुरुवातीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रथम शपथ घेतील.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top