जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरांमध्ये "प्रिन्स जाॅस चॅरिटेबल ट्रस्ट"हुपरीच्या वतीने प्रौढ साक्षरता अभियान वर्गाला सुरुवात करण्यात आली.हुपरी शहरांमध्ये निरक्षर लोकांच्यासाठी हा वर्ग चालू केलेला असून,यातून साक्षरतेचे प्रमाण अधिक वाढले जावे,या अनुषंगाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
या अभियानाचे उद्घाटन मा.श्री प्रसाद कोळपे (सहायक पोलीस निरीक्षक हुपरी) तसेच या अभियानाचे अधिकारी- शशिकांत वसगडेकर,सतीश कंगणे व अन्याय विरोधी सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा.सौ.वैशाली कंगणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी हुपरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती शेवाळे,सुनील माळी,दिग्विजय कोळी,मारुती गिरीबुवा, रमेश कांबळे,प्रवीण सनदे,सागर माळगे,जॉकी माने,प्रियंका माळगे,पुनम माळगे,लता माने,सुजाता चौगुले,कमल जिरगे, अनिता कांबळे,कल्पना कंगणे,द्रौपदा लोखंडे,आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.