जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली असून,ह्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज मुंबईत होणाऱ्या आझाद मैदानात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस,राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत.व राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेतील का नाही? हे अजून निश्चित नाही.
मुंबईत होणाऱ्या या आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांचेसह भारतीय जनता पक्षाचे इतर राज्यातील मुख्यमंत्री, सन्माननीय व्यक्ती,भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी- कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असून, एकूण 42000 जण उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
देशातील संपूर्ण 2000 व्ही.व्ही.आय.पी.सन्माननीय व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली असून,याशिवाय जवळपास ऐतिहासिक शपथविधीच्या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 4000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.यामध्ये पोलीस अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यातील नागपूर मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार असून, त्यापूर्वी 12 डिसेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळा विस्ताराचा पहिला टप्पा पार पडू शकतो अशी शक्यता वाटत आहे.