जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
06 डिसेंबर 1956 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.या महापरिनिर्वाण दिवसाच्या कार्यक्रमासाठी हुपरी शहरांतून काही बौद्ध अनुयायी मुंबई या ठिकाणी त्यांच्या महापरीनिर्वाणदिनी उपस्थितीत झाले होते.तेथून बौद्ध अनुयायीनी मुंबई येथून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी हुपरी येथे आणून त्या ठिकाणी प्रसिद्ध असे चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.हुपरी येथील चैत्यभूमी स्मारकामध्ये त्यांच्या अस्थी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत.हुपरी या ठिकाणी त्यांच्या अस्थी ठेवलेल्या असून,त्या दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत.आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी या अस्थीना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात अभिवादन करण्यासाठी करण्यासाठी हुपरी परिसरामधील असंख्य नागरीक व बौद्ध अनुयायी उपस्थितीत होते.
हुपरी ठिकाणी या चैत्यभूमीचे स्मारक स्थापित करण्यासाठी हुपरी शहरातील समितीचे अध्यक्ष मा.सुभाष मधाळे, उपाध्यक्ष मोहन शिंगाडे,खजिनदार बाळासो कांबळे,सचिव विद्याधर कांबळे,व संचालक मंडळाने भरपूर असे परिश्रम करून,प्रसिद्ध असे चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले आहे.या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलेले आहे.या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी पंचक्रोशी व कर्नाटकातूनही लोक येत आहेत.
या कार्यक्रमासाठी मा.डी.वाय.एस.पी.समीर सिंह साळवी, हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सलगर. अप्पर तहसीलदार शेरखानी,नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे,हुपरीचे सर्कल ऑफिसर प्रदीप शिंदे,तसेच माजी सरपंच मंगलराव माळगे,अजित सुतार,दौलतराव पाटील,अण्णासाहेब शेंडुरे,शिवाजीराव जाधव,स्वप्निल हुपरीकर,पांडुरंग माणकापूरे,प्रणित मधाळे,जयकुमार माळगे,रफिक मुल्ला,अजित उगळे,विनायक विभुते, दिनकरराव ससे,सुरेश इंग्रोळे,ज्येष्ठ नागरिक संघ व हुपरी परिसरातील अनेक नागरिक व बौद्ध अनुयायी उपस्थित होते.