जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी आदिवासी विकास मंत्री दिवंगत मधुकराव पिचड यांचे आज सायंकाळी नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान सायंकाळी 6:30 वाजता निधन झाले असून,उद्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी 4:00 त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मागे त्यांच्या पत्नी,मुले वैभव व हेमंत असा परिवार असून,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आदींनी शोकसंदेशात आदरांजली वाहिली आहे.
दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आदिवासी क्षेत्रातील कार्य फार मोठे असून,त्यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणासाठी फार मोठा संघर्ष केला आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड हे सन 1980 पासून ते सन 2004 पर्यंत सलग सात वेळा आमदार होते.