जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर यांचा एकट्याचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.आज दि.9 डिसेंबर 2024 रोजी याबाबतीत औपचारिक घोषणा विधानसभेत होणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहण्याची शक्यता आहे.
काल दुपारी 12:00 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती.सदरहू कालावधीत फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने,राहुल नार्वेकर हे आता दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने राहुल नार्वेकर यांना दुसऱ्यांदा संधी देत विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवले आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की,एखाद्या पदाची जबाबदारी देताना नुसते त्यांचे वय व अनुभव लक्षात न घेता त्यांची गुणवत्ता ही लक्षात घेतली जाऊन,तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भारतीय जनता पार्टीने केले आहे.एकंदरीत आज दि.9 डिसेंबर रोजी औपचारिक घोषणा होऊन विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड होईल .