जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्हा तलवारबाजी संघटनेकडून,नांदेड येथे दि १३ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ३५ व्या वरीष्ठ गट (सिनिअर) राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे.
सदर निवड चाचणी मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०९ वाजता इशिता मल्टीपर्पज हॉल,बुधगाव ता.मिरज,जि.सांगली.येथे होणार असून ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १३ वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळाडू सहभागी होण्यास पात्र आहेत.या चॅम्पियनशिप मध्ये ३०-१०-२०११ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले खेळाडू यामध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.अशा खेळाडूना सदर निवड चाचणी मध्ये सहभागी होता येणार आहे.
तरी सांगली जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर निवड चाचणी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ.शुभम जाधव मो.८८५५९२२९२२ यांनी केले आहे.