सांगलीतील प्रसिद्ध बहुचर्चित असलेल्या शेतीनाल्याचे प्रदूषित पाणी,कृष्णेच्या पात्रात मिसळणे प्रकरणी,झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला आली जाग;शेरीनाल्यावरील सर्व उपसा करणाऱ्या मोटारी चालू.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीच्या प्रसिद्ध बहुचर्चित असलेल्या शेरी नाल्याचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी,गेले काही दिवस कृष्णा नदीमध्ये प्रचंड प्रमाणात मिसळत होते.तेच पाणी सांगलीकर नागरिकांना पिण्यासाठी मिळत होते.त्यासाठी प्रदूषित दुर्गंधीयुक्त शेरी नाल्याच्या पाण्याचे भरलेले कॅन नागरिक जागृती मंचने व शहरातील नागरिकांनी,राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मा.आयुक्त सांगली,मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका यांना पाठवले होते. 

नागरिक जागृती मंच व शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाला जाग आली.पाठपुरावा करून चालू असलेल्या नागरिक जागृती मंचच्या व शहरातील नागरिकांच्या आंदोलनाची दखल सरकारी दरबारात अखेर घ्यावी लागली.त्यामुळेच नाल्यावरील सर्व मोटरी चालू करण्यात सद्यपरिस्थितीत यश आले असून, आता शेरी नाल्याचे प्रदूषित पाणी कृष्णेच्या पात्रात मिसळणे बंद झाले आहे.महाराष्ट्र सरकारच्या दरबारी प्रलंबित असलेला एस.टी.पी.प्लांट चा प्रस्ताव जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहु असे नागरिक जागृती मंचचे नेते श्री सतीश साखळकर यांनी म्हटले आहे तसेच एस.टी.पी.प्लांटच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रस्ताव प्रकरणी,विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गांभीर्यपूर्वक तातडीने लक्ष घालून राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा,अन्यथा आपल्या दारात बसून आंदोलन करावे लागेल असे नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखरकर यांनी म्हटले आहे. 

सांगलीतील बहुचर्चित असलेल्या प्रसिद्ध अशा शेरी नाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी,कृष्णेच्या पात्रात वारंवार मिसळणे बंद होण्यासाठी,महाराष्ट्र शासनाच्या दरबारी प्रलंबित असलेला एस.टी.पी.प्लांट लवकरात लवकर मंजुरी मिळून व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन,सांगली शहरातील नागरिकांची आरोग्याच्या गंभीर समस्येपासून सुटका होणे हे फार महत्त्वाचे व विद्यमान सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या कडून अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top