जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथील,बुधगाव ग्रामपंचायत स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे.बुधगाव ग्रामपंचायत स्वच्छता महिला कर्मचारी या वर्षभर ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता अविरतपणे काम करत असतात.त्यांच्या या कामांची व कार्यांची दखल घेत,बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वैशाली विक्रम पाटील यांनी स्वखर्चाने,या महिला कर्मचाऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले आहे.या कामी बुधगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
बुधगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वैशाली विक्रम पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तितके थोडे होईल.सदरहू उपक्रमाची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील इतरही ग्रामपंचायतीनी आदर्श निर्माण करावा असे वाटते.बुधगाव गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने,स्वच्छता ही ईश्वर सेवा मानून,बुधगाव ग्राम पंचायतीच्या महिला कर्मचारी अविरतपणे काम करीत असतात.त्यामुळेच या महिला कर्मचाऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.
तसेच या पुढील काळातील या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आरोग्य तपासणी केली जाईल व त्यासाठी प्रयत्नशील राहो,असे मनोगत बुधगाव गावच्या सरपंच सौ.वैशाली विक्रम पाटील यांनी व्यक्त केले.