महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी; राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी; महाराष्ट्र राज्यात देवेंद्र पर्वास सुरुवात:--!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असून,त्यांचे बरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.आज मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या ऐतिहासिक शानदार सोहळ्यात शपथविधी समारंभ पार पडला.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे व अजित पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. 

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेसह केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री वर्ग उपस्थित होता.महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथराव शिंदे व अजित पवार यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले असून,या टीम मुळे महायुतीला एवढे भव्य यश मिळाले असून,महाराष्ट्र राज्यातील लोकांच्या आशा- आकांक्षा ही टीमच पूर्ण करेल अशी अशा व्यक्त करून,केंद्र सरकारही महाराष्ट्राच्या विकासाला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

आज झालेल्या ऐतिहासिक महाराष्ट्र राज्याच्या शपथविधी समारंभ सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे राज्यातले इतर मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते,पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यास उद्योग जगतातील व चित्रपटसृष्टीतील अनेक सन्माननीय मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली होती.यामध्ये कुमार मंगल बिर्ला,उदय कोटक,अनिल अंबानी,अजय पिरामल,अभिनेता शाहरुख खान,सलमान खान,क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर,अंजली तेंडुलकर,अभिनेता रणबीर कपूर,रणवीर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर,मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मानवतावादी दृष्टिकोनातून पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुह्राडे यांना पाच लाखांची वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याचे निर्देश दिले.एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील आझाद मैदानावरील शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top