जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी : वैशाली कंगने)
बेळगाव जिल्हासह राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवून 1202 कोटी ठेवीचा टप्पा पार करून 2000 कोटींकडे वाटचाल करणाऱ्या श्री.अरिहंत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि; बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेचा शुक्रवार दि.3 जानेवारी 2025 रोजी हुपरी येथे 61 वी शाखेचे उद्घाटन सकाळी 11 वाजता माळी बिल्डिंग येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी दिली.
विविध कर्ज योजना व ठेव योजनांचा लाभ सर्वसामान्य सभासदांना देऊन त्यांच्या आर्थिक जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केल्याने ही संस्था जवळच्या महाराष्ट्र राज्यातही विस्तारित व्हावी अशी सभासदांची मागणी होती.या मागणीची दखल घेत मल्टीस्टेटच्या माध्यमातून संस्थेत महाराष्ट्र राज्यात शाखा प्रारंभ केला आहे.शुक्रवार दि.3 जानेवारी 2025 रोजी नव्या ठेवी आणि नव्या योजनेसह हुपरी येथे शाखेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
यावेळी सहकार रत्न,युवा नेते उत्तम पाटील,उपाध्यक्ष सतीश पाटील,सर्व संचालक,संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे,शाखा अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते.