जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी-वैशाली कंगने)
रयत शिक्षण संस्थेचे,शांता-रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसाण्णा इंग्रोळे ज्युनिअर कॉलेज,हुपरी या विद्यालयात 6 जानेवारी 2025 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार सतीश कंगणे व विद्यालयाचे प्राचार्य श्री.झावरे ई.एस.यांच्या हस्ते करण्यात आले.या दिनाचे औचित्य साधून तसेच पत्रकार सतीश कंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य झावरे सर यांचे हस्ते पुष्पगुच्छ व भेटकार्ड देण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त विद्यालयातील सोहम पोवार,विनय श्रीखंडे,श्रवण सुतार या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.पत्रकार सतीश कंगणे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकार दिनाचे महत्त्व विशद केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री.झावरे सर यांनी दैनंदिन जीवनामध्ये तसेच समाजामध्ये पत्रकारांचे किती महत्त्व आहे हे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार शहाबुद्दीन घुडूभाई,हुमायून नदाफ,रणजीत देवणे,अलाउद्दीन मुल्ला,प्रतीक निंबाळकर या सर्व पत्रकार व संपादक बंधूंचा विद्यालयातर्फे मा.प्राचार्य झावरे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री.पांढरवळे पी.बी.यांनी केले.व उपस्थितांचे आभार श्री.पोवार एस. एस.सर यांनी मानले.