जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी- वैशाली कंगने)
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आजच्या झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये हुपरी पोलीस आणि हुपरी परिसर पत्रकार संघटना यांच्यातील रोमहर्षक सामन्यात हुपरी पोलिस टीमचा 57 धावांनी विजय झाला.येथील सिल्वर झोन परिसरातील मैदानात हा क्रिकेट सामना ठेवण्यात आला होता.सामन्याचे उदघाट्न हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित नरळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याची सुरवात करण्यात आली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हुपरी पोलीस संघाने आठ षटकात 113 धावांचा डोंगर उभा केला होता प्रतिउत्तरात खेळणाऱ्या पत्रकार संघटना संघाला 56 धावातच रोखून हा सामना हुपरी पोलीस संघाने जिंकला.गोलंदाजी करताना हॅट्रिक करून पाच विकेट घेणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर 79 धावांची खेळी करणारे पोलीस टीमचे ट्राफिक पोलीस दर्शन धुळे यांना उत्कृष्ट सामनावीरने सन्मानित करण्यात आले.त्याचबरोबर विजेत्या संघाला विजयी ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या संघाला उपविजेता ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पोलीस संघाचे कप्तान एन.आर.चौखंडे आणि पत्रकार संघाचे कप्तान प्रवीण कुंभोजकर यांनी ट्रॉफी घेतली.
पंच म्हणुन ललन पाटील,विकास भिसे,अभिजित शेटके,जितु गायकवाड,स्कोरर म्हणुन जावेद मुल्लानी यांनी काम पहिले.यावेळी हुपरी पोलिसचे पोलीस निरीक्षक एन.आर.चौखण्डे,अशोक चव्हाण,एकनाथ भांगरे,युवराज कांबळे,प्रकाश मांडवकर,बसवनकर,माटुंगे मेजर तर पत्रकार संघटनेचे मुबारक शेख,रणजित देवणे,राजेंद्र शिंदे,सतीश कंगणे,विठ्ठल मोहिते,संजय साळोखे,प्रतीक निंबाळकर,शहाबुद्दीन घुडूभाई, हुमायुन नदाफ यांचेसह पोलीस आणि पत्रकार उपस्थित होते.